‘आपल्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले’, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र

मुंबई | एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले.

शिवसेनेच्या 40 आमदारांचा गट एकनाथ शिंदेसोबत फुटला असला तरी अजूनही 15 आमदार शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. यांच्यातील एक म्हणजे वैभव नाईक ज्यांनी बंडखोरी न करता शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

आमदार वैभव नाईक यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी भावनिक पत्र लहित महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटत असल्याचं नमूद केलं आहे. तर तुमच्या भूमिकेमुळे शिवसेनेला बळ मिळालं असल्याचं देखील उद्धव ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत.

आईच्या दुधाशी बेईमानी करू नका हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे. आणि शिवसेना आमदार म्हणून तुम्ही या निष्ठेचे पालन केले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं दाखवून दिलंत. कोणत्याही धमक्या किंवा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, असं देखील उद्धव ठाकरेंनी पत्रात नमूद केलं आहे.

कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी ते शिवसेनेसोबतच असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहित नाईक यांच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आबाबा! रणवीर-दीपिकाने खरेदी केलं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

काळजी घ्या! मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ भागात रेड अलर्ट जारी

‘नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आमच्या पक्षाला कोणतीही विचारणा…’, शरद पवारांचा खुलासा

शिंदे सरकारची आज मोठी परिक्षा, बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?

…अन् पडत्या पावसात रावसाहेब दानवे वारकऱ्यांसाठी झाले चहावाले