Share Market: लाखाचे केले 20 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

मुंबई | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात (Stock market) चढ उतार पहायला मिळत आहे. आज देखील शेअर बाजारात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सेन्सेक्समध्ये आज 384 अंकाची वाढ झाली. अशातच एका शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे.

बाजारात सध्या विक्रीचा दबदबा कायम असून ओमिक्राॅनने (Omicron) गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढवलंय. त्यामुळे आता गुंतवणूकदार आता शेअर विकत घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं दिसतंय. मात्र, काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण ठरले आहेत.

रोसिल रिन्युएबल्स (Borosil Renewables) चा हा शेअर सध्या मल्टीबॅगर ठरताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात या शेअरची किंमत 34.95 रुपयांवर झाली घसरली होती. मात्र, कोरोना काळानंतर सर्वकाही सुरू झालं आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

कोरोनानंतर आता केवळ 19 महिन्यात या शेअर्सची किंमत 694 वर गेली आहे. म्हणजेच हा शेअर्स तब्बल 1900 टक्क्यांनी वाढला आहे. 19 महिन्यांचा काळ जरी मोठा असला तरी रिटर्न्स देखील चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने गुंतवणूकदार आनंदात आहेत.

जर गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते तर आता 20 लाख रिटर्न्स मिळाले असते. एक महिन्यापूर्वी रोसिल रिन्युएबल्सचा शेअरची किंमत 510 वर होती. आता एका शेअरची किंमत 694 आली आहे.

सध्या ओमिक्राॅनमुळे बाजारात अस्वस्तता दिसत असली तरी फॅब इंडियाच्या आगामी आयपीओमुळे गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. लवकरच फॅब इंडियाचा आयपीओ बाजारात येणार आहे.

कमी वेळात जास्त कमाई करण्याची संधी सर्वच गुंतवणूकदार पाहत असतात. अशाच गुंतवणूकदारांसाठी ही सर्वात मोठी संधी ठरली होती.

दरम्यान, आज शेअर बाजारात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. सेन्सेक्स आज 384 अंकांनी घसरून 57,315 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये देखील 117 अंकाची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

रणवीर सिंगने केलं कपिल देव यांना KISS?; सोशल मीडियावर ‘या’ फोटोची एकच चर्चा

‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता” 

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?