मुंबई | एका मॅगझिनसाठी अभिनेता रणवीर सिंग यानं असंकाही फोटोशूट केलं आहे. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. रणवीरने सिंगने न्यूड फोटोशूट केलं आहे.
नेहमीच आपल्या लुक आणि कपड्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या रणवीरने आता चक्क न्यूड फोटोशूट करत सर्वानां धक्का दिला आहे.
रणवीरचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यावर रणवीरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
नग्न शरीराचं प्रदर्शन करणं तसं माझ्यासाठी फार अवघड नाही. पण माझ्या काही भूमिका सादर करताना मी तर यापेक्षाही नग्न झालोय. माझ्या अभिनयातून लोक माझ्या नग्न शरीराच्या आतला आत्माही पाहू शकले असतील, असं तो म्हणाला आहे. तसेच मी हजारो लोकांपुढे असा नग्न होऊ शकतो. कसोटी तर मला पाहणाऱ्या प्रेक्षकांची आहे, असंही त्याने म्हटलंय.
लोकांच्या टीकेला न जुमानता आणि नेटकऱ्यांकडे लक्ष न देता रणवीरने पुन्हा एकदा अनोखं फोटोशूट करत चकित केलं आहे. रणवीर सिंहने पेपर मॅगझिनसाठी हे अतिशय बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेता पूर्णपणे कपड्यांशिवाय दिसत आहे.
दरम्यान, रणवीरच्या या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर विविध बॉलिवूड पेजेसवर शेअर करण्यात आला आहे. फॅशनवरून सतत चर्चेत असणाऱ्या ‘डाएट सब्या’ या पोर्टलवरही हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरेंनीच सांगितलं तुम्हाला वाटेल ते करा, मग आम्ही शिंदे गटात गेलो”
आगामी निवडणुकांबाबत रावसाहेब दानवेंचा सर्वात मोठा दावा!
“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”
‘एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट होता, तरीही…’; बंडखोर आमदाराच्या आरोपाने खळबळ
“उद्धव ठाकरेंनी वडिलांचा 90% पक्ष संपवला, आदित्यने ठरवलं पप्पा उरलेला 10% मी संपवणार”