“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

मुंबई | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.

नेमका मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे.

हे सरकार लवकरच कोसळणार असा दावा वारंवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून केला जात आहे. पण या सरकारला दृष्ट लागू नये म्हणून हे सरकार पडणार नाही. काही काळजी करू नका हे सरकार पडणार नाही, असं ते म्हणालेत.

आम्ही सगळेजण देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करतो, वाढदिवसादिवशी फडणवीस आम्हाला भेटले त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. त्यांना शुभेच्छा द्यायची आम्हाला संधी मिळाली, असंही उदयनराजे म्हणालेत.

अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की आता लवकरात लवकर हा विस्तार होईल. त्याबाबतच्या घडामोडी आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नवं सरकार स्थापन होऊन 20 दिवस उलटून गेले. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहू्र्त लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

“शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं”

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर