जालना | काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत जलआक्रोश मोर्चा काढला होता. असाच मोर्चा भाजपने आज जालना जिल्ह्यात देखील काढला.
भाजपच्या आजच्या मोर्चात देवेंद्र फडणवीस तुफान टोलेबाजी करताना दिसते. जोपर्यंत सरकार पाण्याचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत या सरकारला झोपू देणार नसल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला पाणी प्रश्नावरून धारेवर धरलं. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी फडणवीसांचं तोंडभरून कौतुक केलं.
शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी फडणवीसांचं कौतुक केलं. तर येणारा काळ हा परिवर्तनाचा असेल असं वक्तव्य देखील रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नाच्या मुद्द्यानंतर आता भाजपने जालन्यातील पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरून रावसाहेब दानवेंसह देवेंद्र फडणवीसांनीही खोचक शब्दात टीका केली आहे.
हे सरकार ईश्वर भरोसे चालू असल्याची टीकाही फडणवीसांनी केली. तर फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार चालवतात आणि हे सरकार भगवान चालवतं, असा घणाघात फडणवीसांनी केला. तर शतरंज का बादशाह म्हणत रावसाहेब दानवेंनी फडणवीसांचं कौतुक केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे योग्य नाही’; दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं
‘राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ पण…’; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात, हे सरकार तर भगवान चालवतो”
‘फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली’, दीपाली सय्यद कडाडल्या
रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले ‘विरोधकांनी माझ्या मागे….’