व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित नसतील, जाणून घ्या

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन या दोन राष्ट्रामध्ये आज युद्धाला सुरूवात झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ल्याची घोषणा केली.

मागील काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला वाद आज शिगेला पोहोचला. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चर्चेचा विषय ठरले आहेत.

रशियातील सेंट पीटर्सबग शहरातील सामान्य कुटुंबात जन्मलेले व्लादिमीर लहानपणापासून तापट स्वभावाचे होते. ज्युदो आणि सांबो यांसारख्या खेळाची प्रचंड आवड.

शाळेत असल्यापासून चंचल, उत्साही आणि चतुर स्वभावाच्या पुतीन यांनी काॅलेजच्या दिवसांपासून वेगवेळ्या खेळात रस दाखवला त्याचबरोबर त्यांनी कायद्याचं शिक्षण देखील पुर्ण केलं.

रशियन सरकारकडून संचालित करण्यात येणाऱ्या इंटेलिजन्स एजन्सी केजीबीमध्ये त्यांची नियुक्ती झाली मग काय? एकामागून एक मोठमोठ्या ऑपरेशनमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

केबीजी ही रशियाची गुप्तहेर संघटना. भारताची तशी राॅ ही गुप्तहेर संघटना आहे तशीच रशियाची केबीजी देशाविरोधी कारवायांवर काम करते. पुतीन यांनी केजीबीच्या डायक्टरेट सेक्रेटरी पदावरून करियरची सुरूवात केली.

पुढे जाऊन त्यांनी Security Council of Russian Federationच्या संचालक पदावर देखील काम केलं. त्यावेळी बोरिस येल्तसिन यांच्या नजरेत पुतीन भरले. त्यांनी पुतिन यांना आपला वारसदार म्हणजेच रशियाचा पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलं.

मार्च 2000 मध्ये पुतीन पहिल्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. पुढे 2008 मध्ये या कालावधीत त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2008 साली दिमित्री मेदवेदेव हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले.

मात्र, फक्त 4 वर्षातच रशियाचं वारं बदललं आणि पुतीन पुन्हा रशियाचे सर्वेसर्वा बनले. त्यानंतर आतापर्यंत वेगवेळ्या घडामोडीनंतर पुतीन यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आता अमेरिकेने देखील उडी घेतल्याचं चित्र समोर येतंय. त्यामुळे पुतीन यांचा युद्धाची घोषणा करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे आता येणारा काळच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या- 

नवाब मलिकांच्या अटकेवर रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

“एखाद्या मुलीला एकदा I Love You बोलणं हा गुन्हा होत नाही” 

‘बांगलादेशातून मुली आणून…’; ‘या’ भाजप नेत्याचा मलिकांवर सनसनाटी आरोप 

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम