मुंबई | शिवसेना आणि शिंदे सरकार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढच चालला आहे. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठा दावा करत शिवसेनेले डिवचलं आहे.
पुढच्या वेळेस ही भाजप आणि शिवसेनेचं सरकार निवडून येणार, असंही भाकित रावसाहेब दानवे यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे पुन्हा नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
कुठल्याही संधीचा फायदा घेतला नाही, 2019 ला निवडणुका झाल्या तेव्हा सगळ्यांचे म्हणणं होतं की आपण भाजपसोबत युती करावी. ही युती जनतेला मान्य होती, मात्र मनाप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी युती केली, त्यामुळेच आज हा दिवस उजाडला असाही टोला देखील दानवेंनी शिवसेनेला लगावला आहे.
ज्यांच्याकडे जास्त संख्या त्याचा पक्ष असतो, त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदारांची संख्या आहे, तसेच जास्त खासदारांची संख्या आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, असंही दानवे म्हणालेत.
आताची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, मतदारांना संभाळणारा आणि विचारणारा नेता नसेल तर ते काय करतील असा सवाल ही दानवे यांनी विचारला आहे. तसेच ती मत फुटली नाहीत त्यांनी सद्विवेक बुद्धीने मतदान केलं, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”
‘एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट होता, तरीही…’; बंडखोर आमदाराच्या आरोपाने खळबळ
“उद्धव ठाकरेंनी वडिलांचा 90% पक्ष संपवला, आदित्यने ठरवलं पप्पा उरलेला 10% मी संपवणार”
विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी
आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ