Top news तंत्रज्ञान देश

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. पण अशा परिस्थितीतही टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये काही पटीने वाढ झाली आहे.

टाटा मोटर्स यांनी २०२० च्या सप्टेंबर महिन्यातील विक्रीबद्दल सांगितले आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनीने ४४,४४४ गाड्यांची विक्री केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ३७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कंपनीने २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात ३२,३७६ वाहनांची विक्री झाली होती, तेव्हा ऑटोमोबाईल क्षेत्र हे कठीण परिस्थितीत होते. टाटा मोटर्स कंपनीने प्रवासी वाहनांच्या विक्रीत तीन अंकांनी वाढ झाली आहे.

२०२० च्या सप्टेंबरमध्ये २१,१९९ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये ८०९७ गाड्यांची विक्री झाली होती. म्हणजेच यावेळी १६३ टक्क्यांनी जास्त गाड्यांची विक्री झाली आहे.

टाटा मोटर्स कंपनीने वित्तीय वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ५४,७९४ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. मागच्या वर्षी कंपनीने २५,८९८ गाड्यांची विक्री केली होती, म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ११२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सचे प्रवासी वाहनाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले,”देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. यातच अनेक संकटांना सामोरे जाऊन पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली आहे. या वाढलेल्या विक्रीमध्ये आमच्या सर्व ‘न्यु फॉरेव्हर’ रेंजच्या सर्व गाड्यांचा सहभाग आहे.”

पुढे बोलताना म्हणाले,”नेक्सॉन ईव्ही गाडीच्या आम्हाला खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. आम्ही मागील तीन महिन्यात ९२४ गाड्यांची विक्री केली.” त्यातच टाटा मोटर्सने २०२० च्या सप्टेंबरमध्ये २३,२४५ व्यावसायिक वाहनांची विक्री केली.

मागच्या वर्षी २४,२७९ वाहनांची विक्री झाली होती. इथे ४.३ टक्क्यांची घट झाली आहे. यावेळी १६५५ गाड्यांची निर्यात केली होती. मागच्या वर्षी ३८०० गाड्यांची निर्यात केली होती. ही घट ५६ टक्क्यांनी कमी आली आहे.

ऑगस्ट महिन्यातील टाटा नेक्सॉन ईव्ही ही देशातील सर्वात जास्त विक्री करणारी गाडी ठरली आहे. यातून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ होताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत लोकांनी टाटा मोटर्सवर विश्वास दाखवला आहे. ऑगस्ट महिन्यात २९६ टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्कार; भाजप नेत्याला ठोकल्या बेड्या!

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!

कोरोना काळात डिप्रेशनमधून कसे वाचावे ? गायक हरिहरन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स…

सुशांतला न्याय मिळणार का याबाबत साशंकता?; जिजाने शेअर केला ‘हा’ फोटो