रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांच्या गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदी

रत्नागिरी | रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांमधे आता सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंनेलन आणि गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदीचा निर्णय जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे.

आपण महाराष्ट्रात राहतो.आपल्या राज्याला वेगळा असा सांस्कृतिक वसा आहे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. लहान मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं रोहन बने यांनी सांगितलं आहे.

देवरूख तालुक्यातील कोसुंब या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाला रोहन बने गेले होते. यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आयटम साँगवर डान्स केला. यानंतर रोहन बने यांनी हा निर्णय घेतला. यासंबंधीचं परिपत्रकदेखील त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान, हा निर्णय इतर जिल्ह्यांमध्येही घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया पालक आणि शिक्षकांनी दिली आहे. रोहन बने यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्व जिल्ह्यासह राज्यात कौतुक होत आहे. पालक आणि शाळेतील शिक्षकांनीही त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देणार”

-“अरे काय पाहिजे सांगा, मी द्यायलाच बसलोय”

-सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

-हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा घणाघाती आरोप.

-“नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”