“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”

मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. भाजपच्या या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाट आहे. राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरली.

शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे.

येत्या दोन महिन्यांमध्ये करेक्ट कार्यक्रम करणार असून देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.

रावणाची लंका जाळण्यासाठी रामभक्त आणि हनुमानभक्त आमदारांच्या रुपात मैदानात उतरले आहेत. आधी आमदार धडा शिकवतील आणि मग जनताच सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असंही रवी राणा म्हणालेत.

शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. या सरकारला पायउतार व्हावं यासाठी योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असं म्हणत राणा यांनी सरकारला इशारा दिला आहे.

पुढील दोन महिन्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होतील. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असा दावा राणा यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! परमबीर सिंग यांचा सीबीआयला दिलेल्या जबाबात अत्यंत खळबळजनक दावा 

विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… 

मोठी बातमी! शिवसेना राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी, भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर 

सोनिया गांधींना रूग्णालयातून डिस्चार्ज, ‘या’ तारखेला ईडीसमोर हजेरी लावणार

अखेर मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निकाल समोर येणार