Ravi Rana: “आयुक्त आरती सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेतली”

मुंबई | अमरावती जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय गोंधळ उडाला होता. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते.

महाविकास आघाडी सरकार आम्हाला त्रास देण्याचं काम करत आहे, असा आरोप राणा दाम्पत्यानं केला होता. परिणामी राज्यात खळबळ माजली होती.

खासदार नवनीत राणा यांनी आपल्यावर महाराष्ट्रात पोलिसांनी अन्याय केल्याची आणि आपल्यासोबत गैरव्यवहार केल्याची टीका ठाकरे संसदेत केली होती.

नवनीत राणा यांनी अमरावती आणि मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणला होता. तो संसदेनं मंजूर केला आहे. त्यानंतर आता रवी राणा यांनी ठाकरे सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेतली होती. आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी त्रास देण्यात आला, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला मातोश्रीवर मोर्चा काढण्यासाठी जात असताना आम्हाला रोखण्यात आलं, असंही राणा म्हणाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या वेळी देखील अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी आम्हाला त्रास दिला, असं राणा म्हणाले आहेत.

दरम्यान, नवनीत राणा यांच्या हक्कभंग प्रस्तावाला संसदेनं स्विकारलं आहे. राज्यातील 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना 6 एप्रिलला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“2 वर्षात तब्बल 19 लाख EVM गायब”, शशी थरूर यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

 Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”