महाराष्ट्र मुंबई

“पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ”

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळतीवर युवक राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ, असं म्हणत राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी कार्यकर्त्यांच्यात उत्साह भरला.

आज राष्ट्रवादी युवकची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी रविकांत वरपे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी तोफ डागली.

जी लोकं पक्षांतर करत आहेत ते म्हणतात साहेब माझे गुरू आहेत… काही म्हणतात साहेब माझ्या हृदयात आहेत… एकजण म्हणतो साहेबांना सोडून जाताना मनाला यातना होतात… मात्र जेव्हा गुरुदक्षिणा देण्याची वेळ येते तेव्हा पळ काढतात. पवारांना गुरू आणि त्यांच्या विचारांना माननारे एकलव्य युवक पक्षात आहेत ते पवार साहेबांना अंगठाच काय आपला देह देतील, अशा शब्दात त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले,  निष्ठा शिकावी एकलव्याकडु…, द्रोणाचार्य यांचा पुतळा तयार करून धनुर्विद्या शिकणारा एकलव्य कूठे, आणि आपल्या स्व:ताच्या स्वार्थी पणासाठी निष्ठा विकणारे नेते कुठे…  आज जेव्हा पवार साहेबांना गुरू दक्षिणा द्याची वेळ आली असताना हे लोक पक्ष सोडून चालले आहेत पण अजूनही पक्षात अनेक एकलव्य आहेत जे पवार साहेबांना निष्ठेने आणि विचाराने गुरू मानतात ते सर्व एकलव्य तुमच्या सारखे भिऊन पळकुटे आणि अंगठा दाखवणारे नसून खऱ्या अर्थाने अंगठा देणारे आहेत.

सर्व एकलव्य मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बळकट करून साहेबांना गुरुदक्षिणा म्हणून आगामी विधानसभा निवडणूक जिंकून देतील, असा विश्वास वरपे यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई विभागीय अध्यक्ष श्री निलेश भोसले आणि राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-साथ सोडलेल्यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी आखली ‘ही’ मोठी रणनीती!

-राजीनामा देण्याअगोदर चित्रा वाघ माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या….- शरद पवार

-‘हे’ पाच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीसोबतच; शरद पवारांचा दावा

-गद्दारीने परतफेड करण्याचा इतिहास आलाय- जितेंद्र आव्हाड

-राष्ट्रवादीचा हा मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार!

IMPIMP