आरबीआयचा ‘या’ बँकेला झटका; केली मोठी कारवाई

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला. मध्यवर्ती बँकेने कमकुवत आर्थिक स्थितीचं कारण देत महाराष्ट्र स्थित मंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला.

RBI ने एका निवेदनात म्हटलं आहे की, 16 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचा व्यवसाय संपल्याने, त्याचा बँकिंग व्यवसाय बंद करण्यात आला आहे. बुधवारी जारी केलेल्या निवेदनात, मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे की, सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना बँक बंद करण्याचे आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.

बँकेचा परवाना रद्द केला आहे, कारण बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि कमाईची शक्यता नाही. बँक चालू ठेवणं तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे आणि बँक सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार ठेवीदारांना पैसे देऊ शकणार नाही. यापुढे बँकेला बँकिंग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्याचा जनहितावर विपरीत परिणाम होईल, असं केंद्रीय बँकेने म्हटलं आहे.

मध्यवर्ती बँकेने म्हटलं आहे की मंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे, ठेवी स्वीकारणं किंवा ठेवींचे पैसे भरणं यांचा समावेश असलेला बँकिंग व्यवसाय ठप्प झाला आहे.

लिक्विडेशनवर असलेल्या प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसी कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांच्या आर्थिक कमाल मर्यादेपर्यंत ठेव विमा दावा प्राप्त करण्याचा अधिकार असेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

RBI ने म्हटलं आहे की बँकेने जमा केलेल्या डेटानुसार, 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार असेल.

महत्वाच्या बातम्या- 

भाजप नेत्याने लावले अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स, म्हणाले ‘दादा आपले आभार’ 

“…तेव्हा तो पठ्ठ्या कुठे होता?, त्यांनी ही नौटंकी आता थांबवावी” 

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”