महाराष्ट्र मुंबई

पंत तुम्ही कितीही लावा जोर; सगळ्यांना पुरुन उरेल हे मराठ्याचं पोर!

मुंबई : “पंत तुम्ही कितीही लावा जोर; मनुवाद्यांना पुरुन उरेल हे मराठ्याचं पोर”, हे वाक्य वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. अभिनेता रितेश देशमुखच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीच्या समोर बसल्यानं रितेशला टीकेचा सामना करावा लागला होता. रितेशवर टीकेची झोड उठल्यानंतर अनेकजण त्याच्या समर्थनार्थ आले. महाराजांच्या पायाशी बसून त्याचं काहीच चुकलं नसल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. सोशल मीडियावर यावरुन मोठा गदारोळ पहायला मिळाला.

इतरांचे फोटोही व्हायरल-

एका ठराविक गटाकडून रितेशला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. देशमुख असल्यामुळेच रितेशला लक्ष्य करण्यात आलं, असाही आरोप झालं. यापूर्वी असे प्रकार घडले होते, मात्र त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, छ. संभाजीराजे यांचे मेघडंबरीसमोर उभे राहिलेले फोटो शेअर करण्यात आले. 

संभाजी भिडेंचा व्हीडिओ व्हायरल-

रितेश देशमुख प्रकरणात नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केलेल्या संभाजी भिडे यांनाही ओढण्यात आले. संभाजी भिडेंचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. 

रितेशनं माफी मागितली-

सोशल मीडियातून पाठिंबा मिळत होता, तरीही रितेश देशमुखने मनाचा मोठेपणा दाखवत याप्रकरणी माफी मागितली. त्याच्या या माफीने अनेकांची मनं जिंकली. ज्यांना वाटत होतं रितेश चुकला त्यांनी त्याला माफ केलं. माफी मागायला नको होती, असंही काही जणांनी म्हटलं.

रितेश प्रकरणावर आलेल्या प्रतिक्रिया-

https://twitter.com/RahulJadhav2901/status/1015440343293091840

https://twitter.com/Ajaykokate55/status/1015416063717081088

 

IMPIMP