मुंबई | पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात.
देशांमधील तणाव वाढल्यामुळे सध्या पेट्रोल डिझेलवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन दरात चढउतार होत असेलेली पहायला मिळत आहे.
पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार देशात आज देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये काहीशी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांमध्ये देशातील किमती मात्र स्थिर आहेत.
एक आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने कर केले होते. त्यानंतर देशातील इंधन दरात घट झाली. काही राज्यांमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांखाली आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टेस्ला कार भारतात आणण्याविषयी Elon Musk यांचा मोठा निर्णय, म्हणाले…
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची सुटका मात्र समीर वानखेडेंच्या अडचणींत मोठी वाढ
“उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संभाजीराजेंची व्यवस्थितरित्या कोंडी केली”