इंधन कंपन्यांच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा!

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये इंधनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनांच्या वाढत्या भावांमुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

इंधनांचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. याबाबत देशभरातील लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

आंतराष्ट्रीय स्तरावरील कमॉडिटी बाजारावर सध्या लॉकडाउनचे संकट घोंघावत आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर इंधनांच्या किंमतीत घसरण होत असली तरी देशांतर्गत इंधनांचे दर स्थीर आहेत.

सध्या देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत कंपन्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून या दरांमध्ये काहीही बदल झालेला नाही. गेले आठ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थीर आहेत.

दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल 90.56 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 80.87 रुपये प्रती लिटर आहे. तसेच मुंबईत प्रती लिटर पेट्रोलचा भाव 96.98 रुपये आहे आणि डिझेलचा भाव 87.96 रुपये  आहे.

दरम्यान, पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येऊ शकतात.

ट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

इंधन दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. इंधन दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर इंधनांचे दर कमी झाले आहेत त्याचप्रमाणे आता देशांतर्गत देखील कमी करावेत, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हा’ तरुण केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला अन् खुर्चीवर बसताच रडू लागला; पाहा मजेशीर व्हिडीओ

ऐन लग्नसराईच्या काळात सोनं 50 हजारापार जाण्याची शक्यता, वाचा आजचा दर

अरे वाह! या’ स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कुटर विषयी तुम्हाला माहीत आहे का? नक्की वाचा

मध्य प्रदेश पोलिसांची गुं.डागिरी! रिक्षा चालकाला भर चौकात मारला; व्हिडीओ व्हायरल

पुढील चार दिवस ‘या’ भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, वाचा सविस्तर

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy