इरफान-ऋषींची एकापाठोपाठ एक एक्झिट; ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम

मुंबई | अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने बसलेल्या धक्क्यातून बॉलिवूड अद्याप सावरलंही नव्हतं त्यात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा परसरली आहे.

ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी निखील आडवाणी दिग्दर्शित ‘डी-डे’ चित्रपटात काम केलं होतं. इरफान खान या चित्रपटात एजंट होते. या चित्रपटात अर्जून रामपाल, हुमा कुरेशी आणि श्रुती हसनदेखील प्रमुख भूमिकेत दिसले होते.

इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोघांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, 24 तासात बॉलिवूडने दोन अभिनेते गमावले आहेत. बॉलिवूडला यापेक्षा मोठा धक्का आजपर्यंत बसला नसावा.

महत्वाच्या बातम्या-

-गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

-पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद

-“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

-एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये- उद्धव ठाकरे

-“काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय”