दिल्ली दरबारी शिवछत्रपतींच्या जयघोषावरून वाद; रितेश देशमुखची बोलकी प्रतिक्रिया

मुंबई | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथेच्या शेवटी ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष केल्याने त्यांना उपराष्ट्रपतींनी चांगलीच समज दिली. यावर शिवसेना नेते संजय राऊतांसह राज्याच्या विविध भागातून विरोध दर्शविण्यात आला होता. आता अभिनेता रितेश देशमुख यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवाजी महाराजांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्याबरोबरच, ‘जय भवानी, जय शिवाजी…जय जिजाऊ, जय शिवराय.’ असं कॅप्शनही लिहिलं आहे.

शिवरायांच्या जयघोषावरून राजकीय वर्तुळात हा वाद चाललेला असतानाच रितेश देशमुखचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, व्यंकय्या नायडू यांच्या त्या वक्तव्यावरून संभाजी ब्रिगेडनेही राज्याच्या विविध भागात निदर्शनं केली होती.

यावर आपली भूमिका स्पष्ट करत उदयनराजे म्हणाले, “रेकॉर्डवर फक्त शपथ जाईल, असं सभापतींनी सांगितलं. त्यावर वादविवाद होत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने खूप राजकारण झालं. महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसणारा नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता.”

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक, सुशांतसिंग राजपुतच्या नावाने सुसाईट नोट लिहून ‘ती’ने केली आत्महत्त्या !

‘मी आता बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच माझे सरकार पाडा’

कोव्हीड योद्ध्यांवर पुन्हा जमावाकडून जीवघेणा हल्ला!

दहा दिवसांचं लॉकडाऊन संपलं, पुणेकरांसाठी पुढील नियम कोणते?

प्रियंका आणि दीपिकाही ‘या’ गुन्ह्यात असल्याची शक्यता; मुंबई पोलीस करणार चौकशी