सासरवाडीऐवजी कर्जत-जामखेड का निवडलंत?; रोहित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

अहमदनगर | हडपसरचे जावई असूनही तो मतदारसंघ न निवडता कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर रोहित पवारांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.

ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं, असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे. संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावतीने मेधा युवा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते.

हडपसर मतदारसंघ सोपा होता. पण कर्जत जामखेडचा गेल्या तीस वर्षापासून विकास झाला नव्हता, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक जणांना वाटायचं की शरद पवार साहेब रिटायर होतील मात्र कोणत्याही संकटांपुढे झुकायचं नाही. हे  शरद पवार यांच्याकडून शिकायला मिळालं, असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलंं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य 

भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण

रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा

गांधी-आंबेडकर-सावरकरांचा इतिहास सांगणं गुन्हा आहे काय?; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र