“अग्निपथ योजना म्हणजे सरकारचं दिशाहीन पाऊल”

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. अनेक राजकिय नेते यावर प्रतिक्रिया देत असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनीही मोदी सरकारवर टीका केली आहे.

अग्निपथ योजनेविरोधात देशातील अनेक भागातील तरूण रस्त्यावर उतरले आहे. या योजनेविरोधात सुरू असलेल्या अनेक आंदोलनांना हिंसक वळण आलं आहे.

या घटनेवरून सोनिया गांधी यांनी तरूणांना शांततेचं आवाहन केलं आहे. तर अग्निपथ ही योजना म्हणजे मोदी सरकारचं दिशाहीन पाऊल असल्याची खोचक टीका देखील केली आहे.

सोनिया गांधी यांचं अग्निपथ योजनेबाबत मत मांडणारं पत्र काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रसिद्ध केलं आहे. सैन्यात सामिल होऊन देशसेवेचं स्वप्न बघणाऱ्या तरूणांप्रती सोनिया गांधी यांनी सहानुभुती दर्शवली आहे.

काँग्रेस पक्ष तरूणांसोबत आहे, असा विश्वासदेखील सोनिया गांधींनी व्यक्त केला. तर ही योजना रद्द करण्यासाठी संघर्ष करू व तुमच्या हिताचं रक्षण करू, असा दावा देखील सोनिया गांधींनी केला आहे.

आपल्या योग्य मागण्यांसाठी शांतता व अंहिसापूर्ण मार्गाने आंदोलन करा, असे आवाहन सोनिया गांधींनी तरूणांना केलं आहे. तर आम्ही सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

दरम्यान, सोनिया गांधी या सध्या आजारी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पत्र लिहित तरूणांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘हे बदल म्हणजे आभाळाला ठिगण लावल्यासारखं’, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरूवात झाली”

अग्निपथ योजनेवरून संजय राऊत मोदी सरकारवर बरसले, म्हणाले…

बिचुकलेंचं एकच लक्ष, आता राष्ट्रपतीपद फक्त; लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं शंभरीत पदार्पण; मोदींनी पाय धुवून आशीर्वाद घेतले