खेळ

कोहली-धोनीनं सामना जिंकून दिला, मात्र चर्चा फक्त रोहित शर्माच्या या विक्रमाची…

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्मानं 52 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 2 षटकार देखील लगावले. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सर्वाधिक शतक ठोकण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. सोबतच त्याने एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतक ठोकण्याचा रेकॉर्ड देखील बनवला आहे. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटर क्रिस गेलच्या नावावर होता.

सिडनीमध्ये झालेल्या या सिरीजच्या पहिल्या सामन्यामध्ये रोहितने 133 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान खेळीदरम्यान त्याने 6 षटकार लगावले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने आतापर्यंत 87 षटकार लगावले आहेत. कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत गेल पहिल्या स्थानावर होता. अॅडलेड वनडेमध्ये रोहितने हा रेकॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे.

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 340 षटकार लगावले आहेत. त्याच्या नावावर वनडेमध्ये 210, टी-20मध्ये 98 तर टेस्टमध्ये 32 षटकार आहेत. ज्यापैकी 89 षटकार त्याने फक्त ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध लगावले आहेत.

याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला 299 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावत 298 धावा केल्या. शॉन मार्शच्या 131 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 298 धावांचा आकडा गाठता आला. शॉन मार्शला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली साथ देता आली नाही. केवळ ग्लेन मॅक्सवेलने 48 धावा केल्या. तर गोलंदाजी करतान सर्वात जास्त विकेट भुवनेश्वर कुमारने 4 विकेट घेतले. तर मोहम्मद शमीने 3 विकेट घेतले. प्रत्युत्तरदाखल भारताच्या विराट कोहलीनं शतक केलं, तसेच महेंद्रसिंग धोनीने शेवटपर्यंत किल्ला लढवत भारताला विजय मिळवून दिला. 


Tags