देशातील सर्व बॉम्बस्फोटांमागे RSS चा हात आहे- नि. न्यायमूर्ती कोळसे पाटील

बीड |  देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात आहे. सध्या आमचं सरकार असल्याने मी याचे पुरावे शरद पवार यांच्याकडे सोपवले आहेत, असा खळबळजनक दावा माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी-शहा या गुंडांना आपल्याला हरवायचं आहे. देशातील सर्व मुस्लिम एका रक्ता-मासांचे आहेत. आरएसएस जर धर्मनिरपेक्ष असेल तर त्यांनी आरएसएसचा सरसंघचालक दलित किंवा मुस्लिम व्यक्तीला करावं. आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर ते ढोंगी आहेत हे उघडं होईल, असंही कोळसे पाटील म्हणाले.

दलित आणि मुस्लिमांनी एकत्र यायला हवं हे गेली 30 वर्ष मी सांगत होतो. आज दलित आणि मुस्लिम एकत्र येत आहेत, याचा आनंद आहे. याची वाट मी 50 वर्षांपासून पाहत होतो, असंही ते म्हणाले.

आरएसएसचे माजी सरसंघचालक गोळवळकरांनी त्यांच्या पुस्तकात लोकशाही नको असे उल्लेख आहेत. भाजप आणि आरएसएस हिंदुंचे शित्रू आहेत. मोदी आणि शहा जन्मापासून कधीच सत्य बोलले नाहीत. आणि जर ते बोलले असतील हे सिद्ध झालं तर मी माझं भाषण कायमचं थांबवेन, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदी आणि शहा खुनी आहेत…. तसे माझ्याकडे पुरावे- न्या. कोळसे पाटील

“दिल्लीकरांसाठी मी जीवन त्यागलं अन् भाजप मला दहशतवादी म्हणतंय याचं फार दु:ख वाटतंय”