नवी दिल्ली | जवळपास गेल्या महिनाभरापासून जग युक्रेन-रशिया युद्धाच्या (Russia-Ukrain War) परिणामांचा विचार करत आहे. अनेक प्रयत्नानंतरही युद्ध थांबण्याचं नावं घेताना दिसत नाही.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांनी युक्रेनला शरणागती पत्करण्यास सांगितलं, पण युक्रेन (Ukrain) कसल्याही परिस्थितीत शरण येणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
रशिया-युक्रेन युद्धामध्ये आता केमिकल शस्त्रास्त्रांचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे. परिणामी जगातील इतर देशांमध्ये चिंता पसरली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध शांततेच्या मार्गानं मिटावं यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाच लक्ष्य करण्यात येत आहे. अब्जाधीश असणारे उद्योजक देखील सध्या युक्रेनमध्ये शांततेसाठी प्रयत्न करत आहेत.
युरोपियन फुटबाॅल क्लब चेल्सी एफसीचा मालक रोमन एब्रामोविच यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. शांततेसाठी वार्ताकारांसह ते युक्रेनला गेले होते.
अब्जाधीशांवर आणि वार्ताकारांवर केमिकल हल्ला करण्यात आला आहे. अब्रामोविचसह तिघांना विविध शारिरीक समस्या जाणवायला लागल्या आहेत.
अंग दुखी, डोळे लाल होणे, चेहरा आणि हातावर स्किनच्या समस्या अशाप्रकारचा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कट्टरतावादी हे सर्व करत आहेत, असं अब्रामोविच यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धादरम्यानच शांतता चर्चा देखील चालू आहे. अनेक देशांचे नेते दोन्ही देशांमध्ये शांतता करारासाठी आग्रही आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज
“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”
“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर”
“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं”
‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य