नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukrain War) पार्श्वभूमीवर जगात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिका, चीन, भारत, जर्मनी, फ्रान्स, जपान या देशांना युद्धात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
अमेरिकेनं (America) आतापर्यंत रशियावर (Russia) अनेक निर्बंध लादली आहेत, युक्रेनला विविध प्रकारची मदत केली आहे. रशियाला इशार देखील दिला आहे. पण आता मात्र अमेरिकेच्या एका खेळीनं जगात संभ्रम निर्माण झाला आहे.
युक्रेन सातत्यानं नाटो देशांच्या हस्तक्षेपाची मागणी करत असताना ही मागणी मान्य झाली नाही. असं असलं तरी अमेरिकेच्या सुरक्षा विभागानं एक महत्त्वाचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
जर्मनीच्या स्पैंगडाहलेम हवाई दलाच्या प्रमुख स्थळावर पोहोचलेल्या लडाकू विमानांना रशियाच्या विरोधात युद्धात वापरण्यात येणार नाही, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेनं हे स्पष्ट केलं त्या हवाई स्थळावर तैनात विमानं ही नाटो देशांच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग आहेत. परिणामी अमेरिकेनं युक्रेनला प्रत्यक्ष युद्धात मदत करण्यास नकार दिला आहे.
पेंटागनचे प्रेस सचिव जाॅन किर्बी यांनी रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य करताना ही माहिती दिली आहे. द ग्रोलर युएस एफ-18 सुपर हाॅर्नेट फायटर जेट एक विशेष सुरक्षा प्रणाली असलेलं जेट आहे.
युद्धादरम्यान विरोधी राष्ट्राच्या रडारला चकवा देण्यासाठी हे लडाकू जेट अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. सुरूवातीला जर्मनीमध्ये तैनात करण्यात आल्यानं अमेरिका युद्धात उतरत असल्याची अफवा पसरली होती.
दरम्यान, सहा जेट सध्या जर्मनीच्या हवाई स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत. सोबत 240 अमेरिकन सैनिक देखील असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज
“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”
“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर”
“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं”
‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य