नवी दिल्ली | गेल्या 22 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. युद्धामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर हळूहळू परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे भारतातील अनेक वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होताना दिसतोय.
भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत, त्यामुळे भारताने रशिया-युक्रेन मुद्द्यावर कोणाच्याही बाजूने कोणतेही वक्तव्य केलेले नाहीत.
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश खाद्यतेलाचे प्रमुख निर्यातदार आहेत. भारतातील सुमारे 70 टक्के सूर्यफूल तेल युक्रेनमधून येतं. त्यामुळे याचा थेट परिणाम सुर्यफुलाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीमुळे तेलाच्या किमतींवरही मोठा परिणाम होणार आहे. दोन्ही देश जागतिक बाजारपेठेत 29 टक्के अन्नधान्य निर्यात करतात. पण युद्धामुळे देशाबाहेर काहीही निर्यात करता येत नाही. त्याचा थेट परिणाम धान्याच्या किंमतीवर होणार आहे.
रशिया हा अनेक धातूंचा निर्यातदार देश आहे. पण युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत.
त्यामुळे धातू आणि स्टीलच्या किंमतींनीही मोठी झेप घेतल्याचं पहायला मिळतंय. अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा ग्राहक आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारताला मोठा फटका सहन करावा लागू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारत बजावणार ‘ही’ महत्त्वाची भूमिका
उन्हाळा वाढतोय काळजी घ्या! येत्या 48 तासात राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार
“महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात”, भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ
बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट
‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा