नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यातील युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. अशातच रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये चर्चासत्र सुरू झाली आहेत.
रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर ताबा मिळवण्यानंतर आता रशिया युद्धात अग्रेसर भूमिका घेत आहे. अशातच आता या युद्धात अमेरिका मध्यस्थीचा प्रयत्न करत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकाही सक्रिय भूमिका बजावत आहे. त्याने युद्धात आपले सैन्य पाठवले नाही. रशियावर दबाव टाकण्याचे सर्व बाजूने प्रयत्न अमेरिका करत आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही रशियासाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद केली होती. त्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाद वाढणार की काय?, अशी चर्चा सुरू होती.
मात्र, आता अमेरिकेकडून रशियाला प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव सर्व निर्बंध हटविण्याचा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
रशियन लष्कराने युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवलं तर त्यांच्यावरील निर्बंध उठवले जाऊ शकतात, असं अमेरिकेने म्हटलं आहे. युक्रेनवर सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवावी लागेल, अशी अट देखील ठेवण्यात आली आहे.
आतापर्यंत या प्रस्तावावर रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अमेरिकेने पुढे येऊन रशियासमोर अशी ऑफर ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अमेरिकेने रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. इतर देशांनीही कठोर निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत रशियन अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पहायला मिळतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि ओबीसी आरक्षणाचा विषय सोडवू”
घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात दिली जातेय सेक्स फॉर रेंटची ऑफर
फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!