S.T Strike: एसटी संपाविषयी महत्त्वाची बातमी आली समोर

मुंबई | दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे सध्याची परिस्थिती खूप चिघळली आहे.

एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी हे संपावर आहेत.

कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर आहे. एसटी कामगारांनी वेगवेगळ्या ठिकाणी यावर तक्रार अर्ज दाखल केले आहेत. या संपात कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आली नव्हती.

काही कर्मचाऱ्यांनी संप मोडून सेवेत रूजू झाले आहेत. मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहे आणि संप करत आहेत.

एसटी विलीनीकरण विषयी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला जास्त वेळ पाहिजे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

हा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयानं 12 आठवड्यांचा कालावधी राज्य सरकारला दिला होता. परंतू ती मुदत संपली आहे.

तरीही, राज्य सरकारला हा कालावधी अपुरा पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं वेळ वाढवून द्यावा, असा अर्ज न्यायालयात केला आहे.

दरम्यान, न्यायालयात आज या अर्जावर सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय निर्णय घेईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता याविषयी काय निकाल येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  काँग्रेस आमदाराच्या मुलीचा हॉट आणि बोल्ड अंदाज, पाहा फोटो

  कोरोना लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर, तज्ज्ञ म्हणाले..

  भाजपचा पुणे शहराध्यक्ष फोन उचलेना, भाजप नेत्याचा मदतीसाठी मनसे नेत्याला फोन

  “बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत बसलेत” 

“आले रे आले मराठे आले…”; बहुप्रतिक्षित ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ