…म्हणून Facebook वर आता दिसणार नाहीत लाईक्स!

नवी दिल्ली : फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता फेसबुक युजर्सना फोटो आणि पोस्टना मिळालेले लाईक्स दिसणार नाहीत. फेसबुक एका नव्या फीचरवर काम करत असून यामध्ये युजर्स आपल्या पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करू शकतात.

इन्स्टाग्रामवरही या फीचरचं टेस्टिंग घेण्यात आलं आहे. टेक क्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुक लाईक काऊंट हाईड करण्याचं हे फीचर सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये देण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरपासून हे सुरू करण्यात येणार आहे. कंपनी या फीचरसाठी लोकांचा फीडबॅक घेणार आहे.

फेसबुकवर पोस्ट अथवा फोटोला कमी लाईक्स मिळाले की अनेकजण निराश होतात.मात्र आता या नव्या फीचरमुळे अनेकांना फायदा होणार आहे. तसेच कमी लाईक्स मिळतात म्हणून अनेक लोक फेसबुकवर पोस्ट करायला घाबरत किंवा केलेली पोस्ट काही वेळाने डिलीट करत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.

फेसबुकने पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करण्याचा विचार केला आहे. सध्या या नव्या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. मात्र युजर्सना हे फीचर कधी मिळणार याबाबत फेसबुकने कोणतीही माहिती दिलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे. नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.

महत्वाच्या बातम्या-