मुंबई | महाराष्ट्रातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने (BJP) कडाडून टीका केली आहे.
वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली होती.
सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचा टोला नवाब मलिकांनी लगावला होता. त्यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील यांनी मलिकांवर टीका केली होती.
त्यावर आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मलिकांना रोखठोक उत्तर दिलं आहे. ट्विट करत सदाभाऊंनी मलिकांवर टीका केलीये.
सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचे नवाब मलिक म्हणतात. वा रे वा नवाब साहेब, हर्बल गांजावाले आपली नशा सत्तेची असल्यानं असं बिन बुचाचं सुचत आहे, असं सदाभाऊ म्हणाले.
प्रश्न कोण दारू पीत आहे हा नाही तर, दारू कुठे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहे याचा आहे, असंही सदाभाऊ म्हणाले आहेत.
दरम्यान, सर्वाधिक दारू पिणारे लोकं भाजपात असून भाजपने दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, असं टोला सदाभाऊंनी लगावला होता. त्यावर आता सदाभाऊंनी रोखठोक उत्तर दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू
आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने
मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर
“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?”
वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…