सोलापूर | शरद पवार यांचं आडनाव आगलावे करा. कारण शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं आहे, अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.
शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केलं, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केलाय.
शरद पवारांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचं काम केलंय, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.
सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते आज शेतकरी मेळाव्याला हजर राहणार आहेत. त्यापू्र्वीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आता याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी यापू्र्वीही शरद पवारांवर पंतप्रधान पदावरूनही टीका केली होती.
शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना मी येऊ दिलं नाही. मात्र, येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच, असं ट्विट करत खोतांनी पवारांवर टीका केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; सलग सहाव्यांदा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं
“भारतातील हिंदू मुली मुस्लिम मुलांना घेऊन जातात, त्यामुळे…”
सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव
पुढील 5 दिवस ‘या’ भागात उष्णतेची लाट; हवामान खात्याकडून अलर्ट जारी