‘ग्लासात ग्लास 36 ग्लास…’; सदानंदरावांसाठी सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमा विशेष उखाणा

अमरावती | वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर अनेक सुवासिनींनी आज वडाची पुजा केली. राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज अमरावती येथे वटपौर्णिमा साजरी केली.

सुप्रिया सुळे यांनी वैधव्य आलेल्या महिलांसोबत पटपौर्णिमा साजरी केली. वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमा साजरी करत नवा पायंडा पाडल्याने सुप्रिया सुळेंचं कौतुक देखील होत आहे.

सुप्रिया सुळेंनी एक नवा पायंडा घातल्याने अनेक जण त्यांचं कौतुक करत आहे. मात्र, यासोबतच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पतीसाठी घेतलेल्या खास उखाण्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

ग्लासात ग्लास 36 ग्लास, सदानंद राव फर्स्ट क्लास, असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला. सुप्रिया सुळेंच्या या उखाण्याचं उपस्थित महिलांनी देखील कौतुक केलं.

आपल्या संस्कृतीत सणावारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वटपौर्णिमा, मंगळागौर यासारखे अनेक सण सौभाग्यवतींसाठी महत्त्वाचे मानले जातात.

पतीचे निधन झाल्यानंतर वैधव्य आलेल्या अनेक महिलांना समारंभात किंवा अशा सणावारांवेळी दुर्लक्षित केलं जातं. मात्र, सुप्रिया सुळे यांनी हीच परंपरा मोडीत काढत आज नवा पायंडा घातला.

दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या कृतीचं कौतुक होत असताना त्यांनी ग्लासात ग्लास 36 ग्लास म्हणत सदानंदरावांसाठी घेतलेला खास उखाणाही सर्वांच लक्ष वेधत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मोदीजी चूक दुरूस्त करा’, अमोल मिटकरी संतापले

मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोनची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

देहूत अजित पवारांना भाषणाची संधी नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या, म्हणाल्या…

“पंकजा मुंडेंचा राजकीय एनकाऊंटर करण्याचा भाजपमधून प्रयत्न होतोय”

पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांच्या विमानतळावरील ‘त्या’ फोटोची का होतेय चर्चा?