“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”

नवी दिल्ली | प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) नुकतीच सिनेमाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत, असं साई पल्लवीने म्हटलं आहे.

जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता, असंही साई पल्लवी मुलाखतीत म्हणालीये.

ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे, असंही तिने सांगितलं आहे.

जर तुम्ही माझ्यापेक्षा बलवान आहात आणि मला दडपत असाल, तर तुम्ही चुकीचे करत आहात. मोठा वर्ग समाजातील छोट्या वर्गाला दडपत असेल, तर ते चुकीचं आहे. स्पर्धा दोन समान लोकांमध्ये असावी, असंही की म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या- 

Presidential Election | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी बातमी; भाजपच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना फोन 

“…तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी” 

“आम्हाला ‘अशीच’ सुनबाई हवी”, भाजप खासदाराच्या आदित्य ठाकरेंसाठी खास शुभेच्छा

आषाढी एकादशीनिमित्त अनिल परब यांची मोठी घोषणा, म्हणाले…