…म्हणून साई पल्लवीने धुडकावली 2 कोटी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर!

मुंबई | अभिनेत्री साई पल्लवी तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध झाली. तिने दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साई पल्लवीने तिच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनात विशेष जागा निर्माण केली आहे.

साई पल्लवी तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे जगभरात एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. तिच्या या नैसर्गिक सौंदर्याचं प्रेक्षक मोठ्या प्रमाणात कौतुक करत असतात. त्यामुळे साई पल्लवी सध्या खूप चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

साई पल्लवीला एका फेअरनेस क्रिमच्या जाहीरातीची ऑफर मिळाली होती. तिला यासाठी दोन कोटी रूपयांची रक्कम मिळणार होती. तरीही, साई पल्लवीने त्यासाठी नकार दिला होता, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

साई पल्लवीने आपला आत्मविश्वास गमावल्याचं एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. साईला नेहमी असं वाटत होतं की, तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्समुळे तिला प्रेक्षक नापसंत करतील. आणि तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्स लोक पडद्यावर बघतील.

मी सतत या गोष्टींचा विचार करत होते. मात्र साईच्या चाहनी तित्यांच्या अभिनयाकडे लक्ष दिलं. तसेच तिचं सौंदर्य न पाहता तिच्या पिंपल्स असलेल्या चेहऱ्याला स्वीकारलं. साईने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकलं.

मी सतत घरात बसायचे. मी कधीच घरातून बाहेर गेले नाही. मी सतत या गोष्टीचा विचार करायचे की, लोक मला नापसंत करतील. माझ्या चेहऱ्यावरील पिंपल्स बघतील आणि चर्चा करतील. आणि मला याचा त्रास होईल, असं साईने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

मला माझ्या चेहऱ्यावरील पिंपल्समुळे इनसिक्योर वाटत होतं. त्यामुळे मी फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची ऑफर स्वीकारली नाही. मात्र अनेक लोकांनी माझ्या नैसर्गिक सौंदर्याचं खूप कौतुक केलं, असंही तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

दरम्यान, साई पल्लवीने ‘प्रेमम’ या चित्रपटामध्ये काम करून अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं. साई ही एक चांगली अभिनेत्री आहे. एवढचं नाही तर ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.

महत्वाच्या बातम्या-

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ‘या’ अभिनेत्यासोबत अडकणार लवकरच विवाहबंधनात?

‘पुढील लोकसभा निवडणुकीत…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा 

‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं

डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा! 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय