सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा

मुंबई |  सलमान खान (Salman Khan) हा बाॅलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून नावारूपास आला आहे. परिणामी सातत्यानं सलमानची चर्चा होते.

सलमान खान अनेकदा वादात अडकला आहे. सलमान खान दरवर्षी किमान एक चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असतो.

सलमानला फिटनेस आयकाॅन देखील मानलं जातं. असं असलं तरी सध्या सलमान एका आजारानं भलताच त्रस्त होतं. आजाराविषयी सलमाननं स्वत: माहिती दिली आहे.

ट्युबलाईट चित्रपटाच्या वेळी सलमाननं दुबईत माध्यमांशी बोलताना या आजाराबाबत खुलासा केला होता. परिणामी सध्या या आजाराची अचानकपणे चर्चा होत आहे.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या मज्जातंतूच्या आजारानं मला ग्रासलं आहे, असं सलमान म्हणाला होता. या आजारामुळं अनेकांना आत्महत्या करावी वाटत होती. या आजारामुळं मला नीट बोलता येत नव्हतं, असा धक्कादायक खुलासा सलमाननं केला होता.

2001 मध्ये मला पहिल्यांदा या आजाराबद्दल समजलं. अचानकपणे माझ्या आवाजात विचित्र प्रकारचा लवचिकपणा आणि कर्कशपणा आला होता, असंही सलमान म्हणाला होता.

अमेरिकेत उपचार घेतल्यापासून मला बरं वाटत आहे. परिणामी मला माझ्या फिटनेसकडं लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही, असंही सलमान म्हणाला आहे.

दरम्यान, सलमान खान ज्या ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजारानं त्रस्त आहे त्यात आत्महत्येचा विचार येत असल्यानं हा आजार घातक आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच” 

“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”