सिध्दार्थच्या मृत्यूविषयी सलमानने केलेली भविष्यवाणी ठरली खरी! पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सिध्दार्थच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक बड्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिध्दार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉसच्या13 व्या पर्वाचा विजेता होता. तसेच तो अभिनेता सलमान खानच्या देखील अगदी जवळचा मानला जात होता. सिद्धार्थ बिग बॉसच्या 13 व्या पर्वाची जान आहे, असं अनेकदा सलमानने म्हटलं होतं. सलमानने ट्विट करत सिध्दार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

अशातच आता बिग बॉसच्या13 व्या पर्वातील एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये असल्याचं दिसत आहे आणि सलमान मरणावरून सिध्दार्थची मस्करी करत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ वीकएंडच्या भागातील आहे. यामध्ये सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये झोपल्याचं दिसत आहे तर सलमान बिग बॉसच्या प्रमुख मंचावर उभा आहे. सलमान व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून सिध्दार्थशी संवाद साधत आहे.

यावेळी सलमान सिध्दार्थला म्हणतो की, तुझ्या चाहत्यांनी तुला वाचवलं आहे पण तो वर बसला आहे. तो तुला वाचवणार नाही. त्यावेळी सगळे म्हणतील सिध्दार्थ चांगला माणूस होता. ओरडायचा, भांडायचा, अंगावर धावून जायचा पण माणूस चांगला होता.

तसेच कोणी बिग बॉसमध्ये येऊन प्रेम केलं तर कोणी लग्न केलं. आता कोणी या बिग बॉसमधून अचानकच वर निघून गेलं, असं होऊ नाही, असं सलमान या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

सलमान आणि सिध्दार्थचा हा संवाद मस्करीत चालला असलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु सिध्दार्थच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांनी हा संवाद सिरियसली घेतला आहे आणि ते आता या व्हिडिओवरून सलमानवर टीका करू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सिध्दार्थच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् ती कोमात गेली, वाचा सविस्तर

डॉक्टरांनी सिद्धार्थला ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं परंतु…

शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने घेतला अखेरचा श्वास?

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजची अवस्था पाहून तुम्हाला देखील अश्रू अनावर होतील, पाहा फोटो

‘या’ बड्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता सिद्धार्थ शुक्ला