लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे

सांगली | लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवलं पाहिजे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलं आहे.

मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत, असं आव्हान देखील संभाजी भिडे यांनी दिलं आहे. ते सांगलमीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप काय बेशरम आहे. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवलं पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत, असेही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयावर संभाजी भिडेही यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, अशी थेट मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

राज्य सरकारचा हा निर्णय चुकल्याचं स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी मांडलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात जाईल असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.

चरस गांजा उत्पन्न करण्यासाठी हा समाज पुढे येईल. या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्याशी आणि पूर्ण मंत्रिमंडळात बोलणार आहे. हा घेतलेले निर्णय समजून सांगणार आहे. राज्याने असलं बोलायचं नसतं. समाजाला आपण दिशा द्यायची असते. हा निर्णय संताप जनक, नाश करणारा निर्णय आहे, असं ते म्हणालेत.

मला भिमाची आठवण होते. जुगाराचे नादापायी शकुनी मामांनी सगळं हरण केलं. पांडव सगळं हरले. बेशरम पणाने व्यसनाच्या आहारी जाऊन पत्नीला पणाला लावले, असंही ते म्हणाले आहेत. आर आर आबांनी डान्स बार बंद केले. आज आर आर आबा असते तर हा घातकी नीच निर्णय झाला नसता, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल 

पोस्टाची बंपर योजना; महिन्याला गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये 

तरुणांसाठी मोठी बातमी; पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती 

“राज्यपालांनी हे ठाकरे सरकार बरखास्त करावं” 

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या, हे कारण आलं समोर