श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल

नवी दिल्ली | देशात निवडणुकीचं वातावरण आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष आपली ताकद दाखवत आहेत. अशा परिस्थितीत, द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने एक डेटा शेअर केला आहे.

यात 2019 आणि 20 मध्ये सर्वात श्रीमंत पक्ष कोण आहे हे सांगण्यात आलं आहे. द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे.

असाेसिएशन फाॅर डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स (एडीआर) या निवडणूक सुधारणावादी संस्थेने एका अहवालातून महत्वाची माहिती दिली आहे.

निवडणूक वकील एडीआरच्या मते, भाजपने 2019-20 या आर्थिक वर्षात 4,847.78 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. यानंतर बसपने 698.33 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसने ५८८.१६ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने 2019-20 मधील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या मालमत्ता आणि दायित्वांच्या विश्लेषणाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे.

अहवालानुसार, सात राष्ट्रीय आणि 44 प्रादेशिक पक्षांनी मालीला वर्षभरात घोषित केलेली एकूण मालमत्ता अनुक्रमे 6,988.57 कोटी रुपये आणि 2,129.38 कोटी रुपये होती.

महत्वाच्या बातम्या- 

पोस्टाची बंपर योजना; महिन्याला गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये 

तरुणांसाठी मोठी बातमी; पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती 

“राज्यपालांनी हे ठाकरे सरकार बरखास्त करावं” 

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या, हे कारण आलं समोर

 भय्यू महाराज प्रकरणाला नवं वळण; अत्यंत धक्कादायक माहिती समोर