पुणे | महाराष्ट्रातील 25 गडकिल्ले हे खाजगी कंपन्यांना भाडे तत्वावर देण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने निषेध व्यक्त केला आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निषेध नोंदवून भीक मागो आंदोलन करून जमा झालेली रक्कम प्रतिकात्मक स्वरूपात सरकारला मदत म्हणून देऊन हा निर्णय रद्द करण्याचे निवेदन मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आलं.
मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, प्रमोद गोतारणे, प्रशांत धुमाळ, कैलास कणसे, विश्वजीत चौगुले, प्रशांत कुंजीर, सतीश काळे, रवी पवार, वैभव शिंदे, योगेश भोसुरे, प्रभाकर शिंदे, अजित कार्ले, श्रीकांत काकडे, संतोष पवार, किशोर मोरे, प्रदिप कणसे आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने सरकारने गडकिल्ल्यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
दरम्यान, शिवाजी महाराजांशी संबंधित असलेल्या कोणत्याही गडकिल्ल्यांना आम्ही हात लावणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
आगामी मुख्यमंत्री वंचितचाच असणार पण मी….- प्रकाश आंबेडकर https://t.co/eo8IBMk89r @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
अलमट्टी धरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंतीhttps://t.co/bD96LkJzBF @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019
‘आरे’ वाचवलं पाहिजे… अभिनेता राजपाल यादवच्या 6 वर्षीय चिमुकलीचं आवाहन! https://t.co/SOFc298Z4x @rajpalofficial #AareyForest
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 9, 2019