नवी दिल्ली | अनेक देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. सर्वात आधी लसवंत झालेल्या सेलिब्रिटीला देखील आता कोरोनाची लागण झाली आहे.
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोना व्हायरसच्या विळख्यात आली आहे. शिल्पाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला कोरोना झाला असल्याचं सांगितलं आहे.
सर्वात पहिल्यांदा लस मिळालेली शिल्पा शिरोडकर ही पहिली भारतीय सेलिब्रिटी होती. शिल्पा शिरोडकरला लस घेऊन देखील कोरोनाची लागण झाली आहे.
शिल्पा सध्या तिच्या कुटुंबासोबत दुबईत राहात आहे. तिने यावर्षीच जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. शिल्पाला चार दिवसांपूर्वी कोरोना झाला असल्याचं समोर आलं आहे.
माझा कोरोना अहवाल पॉसिटिव्ह येऊन चार दिवस झाले असल्याचं शिल्पाने सांगितलं. यानंतर शिल्पाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
शिल्पाने 1989मध्ये ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होत. यानंतर शिल्पाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
हिंदी चित्रपटांप्रमाणे अनेक हिंदी मालिकांमध्येही शिल्पाने काम केलं आहे. ‘सिलसिला प्यार का’, ‘एक मुठ्ठी आसमान’ यासारख्या मालिकांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ या मालिकेत शिल्पा शेवटची दिसली होती. यानंतर शिल्पा लाईमलाईटपासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“देवेंद्रजी तुम्ही उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…”
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!
संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का; कर्मचाऱ्यांच्या पगारातून…
कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी