मोठी बातमी समोर; शिवसेनेचं निमंत्रण फेटाळत संभाजीराजे कोल्हापूरला रवाना

मुंबई | विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेनं (Shiv Sena) घेतला आहे. यानंतरच छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं. मात्र संभाजीराजे शिवसेनेचं निमंत्रण फेटाळत कोल्हापूरला रवाना झाल्याची माहिती आहे.

संभाजीराजे शिवसेनाच काय तर कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही, अशी माहिती समोर आलीये. तसेच ते वर्षावर जाणार नसल्याचं कळतंय.

संभाजीराजेंना विरोध राजकीय दृष्टा न परवडणारा असल्याने आमदारांनी पक्ष नेतृत्वाकडे विरोध न करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संभाजीराजे यांच्याकडून मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे संभाजीराजे अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश नाही केला तर शिवसेनेच्या प्लान बी प्रमाणे कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?, लाथ मारा त्या खासदारकीला” 

“वसंत भाऊ तुझी राजसाहेबांना सांगण्याची कधी हिम्मत झाली नाही, आता…” 

केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही घेतला मोठा निर्णय! 

‘तू कोण आहेस, गांधी की वल्लभभाई?’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर