“अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो”

मुंबई | मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधल्या आसरानीसारखी आहे. अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो अशी अवस्था आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

राज ठाकरे कायद पाळा असं सांगत असून सरकारने तो पाळला पाहिजे. आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे लोक कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत या हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे, असं ते म्हणालेत.

राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता आम्हालाही आहे. ते काय बोलणार हे आधी कोणीच सांगू शकत नाही, असंही संदीप देशपांडे म्हणालेत.

आम्ही सर्वांनी गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंची ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरेल असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या या सभेतनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आज सभाही ऐतिहासिक सभा असेल, असं संदीप देशपांडेेंनी म्हटलंय.

या सभेकडे फक्त संभाजीनगर, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये होणारी सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” 

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत” 

“…तेव्हापासून राज माझ्या मागावर होते”, शर्मिला ठाकरेंंनी सांगितला लग्नाआधीचा किस्सा! 

राज ठाकरेंच्या सभेआधी असुदुद्दीन ओवैसींनी दिला मनसेला सल्ला, म्हणाले…

अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्रजींना मी देशासाठी वाहून टाकलंय”