‘अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’, मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ

मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर राजकीय भूकंप आला. शिवसेनेतील सर्वात मोठं बंड ते महाराष्ट्रातील सत्तापालट अशा अनेक राजकीय घडामोडी काही दिवसात घडल्या.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळविस्तार झाल्यानंतर मनसेचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यात शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

या सगळ्या चर्चांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सूचक वक्तव्य केलं होतं. शिंदे गटाकडून असा काही प्रस्ताव अद्याप आला नाही पण आला तर नक्की विचार करू, असं राज ठाकरे म्हणाले.

राजकीय हालचालींना वेग आलेला असताना मनसेचे संदीप देशपांडे यांनी सूचक ट्विट केलं आहे. ‘सुपर 30’ या प्रसिद्ध चित्रपटातील डायलॉगसोबत राज ठाकरे व बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत देशपांडेंनी ट्विट केलं आहे.

अब राजा का बेटा राजा नही बनेगा. राजा वही बनेगा जो हकदार होगा, असं सूचक वक्तव्य देशपांडेंनी केलं आहे.

राज ठाकरेच आता बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार दुसरं कोणी नाही, असा या ट्विटचा अर्थ असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळणार का?, असंही आता बोललं जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करू नये”

‘गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर’, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले

‘मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती’, भोगामंत्री म्हणत दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं

“राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीये”

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंची पूनम पांडेकडून प्रशंसा, म्हणाली…