भाजपमध्ये प्रवेश करताच उदयनराजेंना शिस्त लागतेय… त्यांनी कॉलर उडवली नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला आणि भाजपत प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही.शिस्तीचं वळण राजांना लागत आहे, त्यांचं अभिनंदन!, अशा शब्दात नुकतेच भाजपवासी झालेल्या उदयनराजेंचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकीयमधून समाचार घेतला आहे. 

शरद पवारांनी उदयनराजेंचा बेशिस्तपणा खपवून घेतला पण अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणं, कॉलर उडवणं किंवा इतर नाट्यछटा करणं असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत. याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याच्या राजांना एव्हाना दिली असेल, असंही त्यांनी म्हटल आहे. 

राष्ट्रवादीत फक्त आडवा-आडवीचं राजकारण चालंत. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना प्रलंबित राहिलेली कामं देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावली, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिली. 

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर राहिलेले उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झाले. ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार नाही तर कामामुळे भाजपला लोकांचा पाठिंबा आहे, असं म्हणत त्यांनी आपल्याच विधानावरून घुमजाव केलं.

दरम्यान, उदयनराजेंच्या भाजपप्रवेशावर बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरेंनीही त्यांना कानपिचक्या घेतल्या. 

महत्वाच्या बातम्या-