टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट

मुंबई | चांगले रिटर्न देणाऱ्या मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये टाटा कंपनीचे काही शेअर्स आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वरील मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीमध्ये, टाटाचे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी शेअरधारकांना जवळपास दुप्पट रिटर्न दिला आहे.

टाटा पॉवर (Tata Power) कंपनीचा शेअर सध्या 217 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. वर्षभरापूर्वी म्हणजेच 28 डिसेंबर 2020 रोजी हा स्टॉक 77 रुपयांवर (Stock Price) ट्रेड करत होता. वर्षभरात तो 77 रुपयांवरून 217 रुपयांवर पोहोचला.

एका वर्षात हा शेअर 188 टक्क्यांनी वाढला आहे. 18 ऑक्टोबरला हा शेअर 257 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या 6 महिन्यांचा विचार केल्यास या भारतीय इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनीने त्यांच्या भागधारकांना सुमारे 75 टक्के परतावा दिला.

टाटा पॉवर व्यतिरिक्त टाटा मोटर्स (Tata Motors) चांगले रिटर्न्स देणारा स्टॉक ठरलाय. हा शेअर सध्या 472.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. एका वर्षापूर्वी तो 186 रुपयांवर ट्रेड करत होता. याचाच अर्थ या शेअरधारकांना सुमारे 150 टक्के रिटर्न मिळाला आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये तो 530.15 रुपयांवर पोहोचला होता.

टाटा टेलिसर्व्हिसेस (Tata Teleservices Maharashtra Ltd) या कंपनीच्या शेअरची किंमत वर्षभरापूर्वी 8 रुपयांपेक्षा कमी होती. पण आज हा शेअर 169.85 रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षात या शेअरमध्ये 2000 टक्क्यांहून जास्त वाढ झालीये.

टाटा समूहाची कंपनी नाल्कोचा (Nelco) स्टॉक वर्षभरात 200 रुपयांवरून 720 रुपयांपर्यंत वाढला आहे. 2021 मध्ये या स्टॉकमध्ये सुमारे 260 टक्के वाढ झाली.

या मल्टिबॅगर स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत त्याच्या शेअरधारकांना सुमारे 120 टक्के परतावा दिलाय. या शेअरने 19 ऑक्टोबर रोजी 960.10 रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर त्यात घसरण दिसून आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ 

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध

“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”