“गरिबांचा गळा किती आवळता…”; संजय राऊतांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई | देशवासियांचं लक्ष लागून राहिलेला देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत मांडला आहे. देशाच्या अर्थसंकल्पावर सितारमण यांनी तब्बल दीड तास भाषण केलं आहे.

आपल्या अर्थसकल्पाच्या मांडणीत अर्थमंत्र्यांनी देशात येत्या काळात किती गुंतवणूक होणार आणि किती काम केलं जाणार यावर भाष्य केलं आहे. सरकारच्या या अर्थसंकल्पावर आता राजकीय चर्चा रंगत आहेत.

मोदी सरकारनं अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. परिणामी आता अर्थसंकल्पावरून वादाला सुरूवात झाली आहे.

मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं. त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसतं. यंदाही बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

गरिबांचा गळा किती आवळतात आणि दोन-चार श्रीमंत येत्या काळात किती श्रीमंत होत जातात ते पाहू, अशी जहरी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या टीकेनंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात यावेळी करदात्यांना काही सवलती मिळण्याची शक्यता होती पण सरकारकून काही सवलती जाहीर करण्यात आल्या नाहीत. परिणामी करदात्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात महिला, विद्यार्थी, संशोधक, युवा उद्योजक, स्टार्ट अपसाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. सरकारकडून अर्थसंकल्प समावेशक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, विरोधक मात्र अर्थसंकल्पामध्ये गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि पगारदारांसाठी काहीच केलं नसल्याची टीका करत आहेत. अशात अर्थसंकल्पावरून जोरदार राजकारण पेटणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

 Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर

क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा 

Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा 

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा