संजय राऊत यांची मोठी घोषणा, म्हणाले, ‘गोवा अन् उत्तर प्रदेशमध्ये आम्ही…’

नवी दिल्ली | देशात सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव अनेक गोष्टींवर परिणाम करत आहे. अशात निवडणूक आयोगानं पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब या पाच राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. परिणामी आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

पाचही राज्यातील निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यात निवडणुक होणार आहे. 10 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात होईल तर 10 मार्चला सर्व राज्यातील मतदानाची मतमोजणी होणार आहे.

पाचपैकी सध्या चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तर पंजाब या एकमेव राज्यात काॅंग्रेसची सत्ता आहे. परिणामी भाजपच्या साम्राज्याला हादरा देण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अगदी तसाच गोव्यात करण्याचा विचार सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी करत आहेत.

शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लढवणार आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी करत निवडणूक लढवण्याचा विचार करत आहोत, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

गोव्यामध्ये काॅंग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा विचार आम्ही करत आहोत. सध्यातरी काॅंग्रेससोबत आमची चर्चा चालू आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जे घडलं ते चुकीचं आहे. त्यांची सुरक्षा आम्हाला महत्त्वाची आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

गोव्यात भाजपनं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याविषयी कितीही भाकित केली असली तरी त्याच्यात काही तथ्य नाहीत, अशी टीका भाजपवर राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर करताच राजकारणात शाब्दिक चकमकीला सुरूवात झाली आहे. अवघ्या देशाची नजर सध्या पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन प्रमुख राज्यांवर आहे.

महत्वाच्या बातम्या –

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत रश्मिकाचं नाव, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ कोटी