मोठी बातमी! संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ

मुंबई | शिवेसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्याप्रकरणी ईडीने (Enforcement Directorate) त्यांना काल रात्री उशिरा अटक केली.

त्यांना आज ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने काही महिन्यांपूर्वीपासून राऊत यांना समन्स पाठविले होते. त्यात त्यांनी अनेकवेळा दांडी मारली होती. अखेर काल त्यांच्या रहात्या घरी ईडीने चौकशीसाठी धाड टाकली आणि त्यांची तब्बल 18 तास चौकशी झाली.

यानंतर ईडीने त्यांना अटक केल्याचे रात्री उशिरा जाहीर केले. न्यायालयाने त्यांच्या प्रकरणावर आज सुनावणी घेतली आणि त्यांना पुढील चौकशीसाठी 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

न्यायालयात ईडीच्यावतीने आठ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. परंतु राऊतांच्या वकिलांनी ती कमी करण्याची विनंती केल्याने ती तीन दिवस करण्यात आली. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे (M G Deshpande) यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

विशेष सरकारी वकिलांनी या कथित घोटाळ्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाला 1 कोटी 6 लाख रुपयांचा फायदा झाल्याचे म्हटले आहे. यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे या प्रकरणातील महत्वाचे दुवा आहेत, असे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले.

संजय राऊतांच्या वकिलांनी यावेळी न्यायालयात युक्तीवादाच्यावेळी ही कारवाई राजकीय सुडापोटी होत असल्याचे सांगितले. तसेच प्रवीण राऊत यांच्याविरोधात गतवर्षी गुन्हा नोंदविला गेला होता आणि त्यांना यावर्षी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

महत्वाच्या बातम्या –

फक्त पत्राचाळच नाही तर ‘या’ घोटाळ्यातही संजय राऊतांचं नाव, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

‘संजय राऊतांनंतर आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा नंबर’, रवी राणांच्या दाव्यामुळे खळबळ

‘लवकरच भाजपचे बुरे दिन येणार’, राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे आक्रमक

शिवसेनेबाबत जे पी नड्डांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया