मुंबई | गोरेगाव (Goregaon) येथील कथित पत्राचाळ भूखंड प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाची (ED) कारवाई सुरु आहे.
आज त्यांची न्यायालयीन कोठडी समाप्त झाल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्याकडील बाजू ऐकून घेतली. पुढील तारखेला ईडी आपली बाजू मांडणार आहे.
विशेष पीएमएलए (Special PMLA Court) न्यायालयात ही सुनावणी सुरु होती. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 13 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे पुढील 13 दिवस राऊतांना तुरुंगात काढावे लागणार आहेत.
गोरेगाव या ठिकाणी पत्राचाळीच्या विकासासाठी मेसर्स गुरुआशिष कन्स्ट्रक्शन (M/s Guruashish Construction) ही प्रविण राऊत यांची कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचा या बांधकामासाठी म्हाडासोबत करार झाला होता.
म्हाडाने घरे न बांधता प्रविण राऊत (Pravin Raut) यांच्या कंपनीने नऊ विकास कामांना 901 कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाज वेगळा प्रकल्प सुरु केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने 138 कोटी रुपये जमा केले, असा सध्या आरोप आहे.
या चौकशीअंती 1039.79 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. त्यात शंभर कोटी रुपये प्रविण राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचे उघड झाले होते. सदर रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर जमा केली होती.
त्यातील 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यावर टाकले होेते. त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले आणि ईडीने त्याची चौकशी सुरु केली.
महत्वाच्या बातम्या –
‘राजस्थानातील 90 आमदारांच्या बंडावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मोठा निर्णय’
“गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार आणि महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार” – सुंधीर मुनगंटीवार
“उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे”; भाजप नेत्याची मोठी टीका
रायगडावरील पिंडदानाचे हिंदुत्वादी संघटनाकडून समर्थन; म्हणाले, “संभाजी ब्रिग्रेडचा आरोप…”