‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 50 लाख

मुंबई | पेनी स्टॉकमधील गुंतवणूक सामान्यपेक्षा जास्त परतावा देऊ शकते. परंतु कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असणं गरजेचं आहे.

लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज हा (Lloyds Steels Industries) देखील असाच एक स्टॉक आहे ज्याने मागील वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

हा मेटल स्टॉक जानेवारी 2020 मध्ये 0.50 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. या दोन वर्षांत या स्टॉकमध्ये सुमारे 4900 टक्के वाढ झाली आहे.

गेल्या एका आठवड्यात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 20.65 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. यामुळे लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांना सुमारे 21 टक्के परतावा मिळाला आहे.

गेल्या एका महिन्यात, पेनी स्टॉकने 10.80 ते 24.95 रुपये अशी पातळी गाठल्यानंतर भागधारकांना सुमारे 130 टक्के परतावा दिला आहे.

जर आपण लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली तर, नवीन वर्ष 2022 च्या सुरुवातीला जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे आजचे 1 लाख रुपये 1.21 लाख झाले आहेत.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.30 लाख रुपये झाले असते.

त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 25 लाख झाले असते.

एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 0.50 च्या पातळीवर 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज सुमारे 50 लाख रुपये झाले असते.

दरम्यान, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची मानली जाते. मात्र असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत अनेक पटींने पैसे कमावून दिले आहेत.

पेनी स्टॉक खूप स्वस्त असतात त्यामुळे त्यात सहज गुंतवणूक करता येते. मात्र अनेकदा निवड चुकल्यामुळे तोटा होण्याचा धोका असतो.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील दारूची दुकानं बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

सिंधुताईंच्या ‘त्या’ इच्छेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; घेतला मोठा निर्णय

पालकांनो मुलांची काळजी घ्या! कोरोनाबाधीत मुलांना ‘या’ आजाराचा अधिक धोका

‘ठाकरे सरकार गेंड्यापेक्षा जास्त असंवेदनशील’;चंद्रकांत पाटील संतापले

मुकेश अंबानींनी न्यूयॉर्कमध्ये विकत घेतली नवीन मालमत्ता, किंमत ऐकून व्हाल थक्क