“युतीबाबत शिवसेना रिलॅक्स मोडमध्ये आहे”

मुंबई : 288 जागांचा विषय आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. युतीसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. युतीच्या घोषणेची दिरंगाई होऊ नये या मताचा मी आहे. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते खोळंबले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत  यांनी सांगितलं. ते ‘टीव्ही 9 मराठी’च्या न्यूजरुम स्ट्राईक या कार्यक्रमात बोलत होते.

युतीबाबत शिवसेना रिलॅक्स मोडमध्ये आहे. युतीसाठी मुहूर्ताची गरज नाही. लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेची युती झाली होती, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

युतीचा फॉर्म्युला अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यावर सांगितला आहे. 50-50 हा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना शब्दाला जागणारा पक्ष आहे. भाजपवर संघाचा प्रभाव ते शब्द पाळतील अशी आशा आहे, असही संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे दिलदारपणे भाजपला जागा सोडत होते. युतीची गरज नसती तर भाजपने लोकसभेवेळी युतीचा पाळणा हलवला नसता, पूर्वी ठरलं होतं दिल्लीत तुम्ही, महाराष्ट्रात आम्ही, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. 

दरम्यान, अमित शहा कालच्या भाषणात म्हणाले हो या ना हो देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील. पण आम्ही म्हणतो काहीही होवो युतीचा मुख्यमंत्री असेल, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-